Blog details

अंश
आपण पदवी घेतली. बऱ्याच परीक्षा दिल्या पण सध्या काहीच करत नाही, नुसतं बसून भाकऱ्या मोडत आहोत, आई-वडिलांना भार आहोत, या पृथ्वीला भार आहोत, माझं आयुष्य असं कसं निरर्थक आहे. माझ्याच नशिबी असं निर्लज्जपणे जगणं काय यावं असा विचार करत 24 वर्षाचा अंश पाय आपटत चालत होता... विचारात बुडालेला, गोंधळात अडकलेला, हातापायाचे वेडे वाकडे इशारे करत चालत असताना एकदा-दोनदा त्याच्या पायाला ठेच लागली पण त्याच्या काही लक्षात आली नाही.
तेवढ्यात एक समोरून वाहन आलं, अंश हा आपल्या बेधुंद अवस्थेत असल्याने त्याच्या काही लक्षात आलं नाही आणि ते वाहन त्याचा पुढे येऊन थांबलं.. वाहनवाल्याने अंशला शिव्या दिल्या पण अंश त्याच्याकडे लक्ष न देता तसाच पुढे चालत होता हे एका शेतकऱ्याने पाहिले... त्याला जोरजोरात हाका मारून आपल्याकडे बोलून घेतले आणि त्याचे विचारपूसना केली..
अंशचे सगळे बोलणे ऐकल्यानंतर तो शेतकरी शांतपणे त्याला बोलू लागला... हे बघ वाघा, मी काही जास्त शिकलेला नाही. पण मला एवढं कळतं 'प्रत्येक गोष्ट मनासारखी होत नसते'.. उदाहरणार्थ माझं हे शेत बागायती लागवडी योग्य नाही... परंतु तरीही मी बराच वेळा भाजीपाला घेण्याचा प्रयत्न केला.. आणि त्यात माझे नुकसान झाले... पण त्यानंतर मी माझ्या शेती अनुसार बरेच वेगवेगळे पिके घेतले तेव्हा मला कळलं की कोणत्या पिक माझ्या शेतामध्ये व्यवस्थित येतं... परंतु या प्रक्रियेमध्ये प्रत्येक पीक घेत असताना माझं नुकसान झालं... त्यावेळी मला खूप राग यायचा, असाह्य वाटायचं, अधिक नुकसान झाल्यामुळे बऱ्याच वेळा मला रडू पण यायचं. एक वेळेस तर पूर्णतः कर्जात बुडालो. सगळेजण बोलू लागले शिवा देऊ लागले तरी पण मी थांबलो नाही... कारण मला काहीतरी नवीन करायचं होतं आणि शेवटी मी ते करून दाखवलं.. पण या सगळ्या काळामध्ये मी स्वतःला कसं सांभाळलो हे मलाच माहित आहे..
अंश वाघा, जेव्हा आपण काहीतरी नवीन करतो किंवा काहीतरी मिळवण्याचा प्रयत्न करतो त्यावेळी आपण लवचिक असलं पाहिजे. कारण पूर्व निर्धारित विचार बराच वेळा घातक ठरतो.. आणि बर का !आपल्या मनामध्ये, विचारांमध्ये एक प्रकारचा मन मोकळेपणा असावा लागतो त्यामुळे आपण निराश होत नाहीत, ना हार मानत नाही.
तुझ्या जीवनात जे घडते त्याचा अनुभव तर मी घेऊ शकत नाही परंतु माझ्या अनुभव सांगतो आहे की.. "वेळ बदलते, काळ बदलतो, परिस्थिती बदलते" त्यामुळे तू निराशा बाजूला सोडून तुझ्या करण्यायोग्य ज्या ज्या गोष्टी असतील त्या त्या करत रहा.. शक्यता आहे की तू बऱ्याच वेळा अपयशी होशील.. परंतु त्या अनेक अपयशामधून तुला तुझ्या योग्यतेचं यश जरूर मिळेल... कारण प्रत्येक जण इथं नशीबवानच आहे फक्त त्याला समजायला हव की ते नशीब स्वतः उजळावं लागत तेव्हा नशीबपण साथ देत... रडण्यात, निराश होण्यात, असाह्य समजण्यास वेळ घालू नको कारण या जगात कोणीच कोणाची मदत करू शकत नाही जोपर्यंत आपण स्वतःची स्वतः मदत करू शकत नाही....
अमोल
(Anokhi Life)